लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन – दोन महिने विलंबाने होत असल्याबाबतची बाब महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडून राज्य शासनांच्या लक्षात आणून दिल्याने , राज्य शासनांकडून दिनांक 06.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडून दिनांक 18.07.2023 रोजी दिलेल्या निवेदनानुसार , राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर परिपत्रक सादर करुन सुचित करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारावर अवलंबून असणाऱ्या इतर बाबी जसे कि मुलांच्या शिक्षण , होमलोन , त्याचबरोबर उच्च शिक्षणाकरीता बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळीच पैसे पाठवता न येणे .
तसेच घराचे भाडे वेळेत देता न येणे तसेच स्वत : वरील व कुटुंबाच्या औषधोपचारासाठी येणारा आर्थिक अडचण ह्या बाबींसाठी वेतन विहील कालावधीत न होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत आहे . या कारणांमुळे राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना होत असल्याने , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन दिनांक 05 तारखेपर्यंत करण्याबाबत , शासन स्तरावर आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे .
यामुळे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचित करण्यात आलेले आहेत कि , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत का होत नाही , तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हाणेकरीता केलेले प्रयोजन याचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल राज्य शासनांस दिनांक 15.09.2023 पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शाासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 06.09.2023 रोजी निर्गिमिक करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !