लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : वेतन या उद्दिष्टाखाली माहे मे ते जून 2023 प्रलंबित वेतन त्याचबरोबर , माहे जुलै 2023 चे नियमित वेतन वितरित करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून मान्यता दिली असुन , राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य हिस्सा लेखाशीर्ष 2202 आय अंतर्गत एक वेतन उद्दिष्टाखाली सन 2023 24 करिता अर्थसंकल्पीत रकमेपैकी माहे मे व जून 2023 या कालावधीतील प्रलंबित वेतन तसेच माहे जुलै 2023 चे नियमित वेतन अदा करण्याकरिता एकूण 14 कोटी 84 हजार 400 रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे ..
वेतन या उद्दिष्टाखाली तरतूद नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे , सदचा खर्च वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 च्या शासन परिपत्रकातील तसेच आनुषंगिक परिपत्रकांच्या सूचनांनूसार करण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला आहे .
तसेच वित्त विभागाने दिनांक 06 मे 2022 च्या पत्रान्वये केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च सुरुवातीला राज्य हिश्श्याच्या लेखाशिर्षातर्गत 01 वेतन उद्दिष्टांतर्गत तरतुदीमधून करण्यात येत आहे . त्याचबरोबर सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाखाली होणाऱ्या कपातीच्या नोंदी जसे GPF , GIS , INCOME TAX इत्यादी राज्यातील hrms / ifmis सेवार्थ मध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
याबाबत राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला दि.31.07.2023 रोजीचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !