Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee payment issues see detail ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मुलभुत हक्कावर गदा आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहेत , कारण सध्य सुरु असलेल्या लाडकी बहीणी योजनेला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पगारापासून वंचित ठेवले जात आहेत , नेमके प्रकरण काय आहे ? जाणून घ्या सविस्तर ..
लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र बहीणींच्या बँक खात्यांमध्ये प्रतिमहा 1500/- रुपये अदा केले जात आहेत , असे असताना राज्यातील अधिकारी / कर्मचारी हे 03 महिने आपल्या हक्काच्या वेतनापासून वंचित असल्याचे वृत्त समोर आले आहेत . राज्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी मागील 03 महिन्यांपासून वेतनापासुन वंचित आहेत , तर माहे डिसेंबर पर्यंत अशीच स्थिती कायम राहणार असल्याचे चिन्हे दिसून येत असल्याने ..
याबाबत राज्यातील जिल्हा प्रशिक्षण संस्थामधील सुमोर 600 अधिकारी / कर्मचाऱ्यांनी वेतन मिळण्याकरीता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर , शिक्षण सचिव तसेच आयुक्त संचालक यांना निवेदन सादर केले आहेत .सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संघनेचे सरचिटणीस सुभाष बुवा म्हणाले कि , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या निधीतुन वेतन दिले जात होते , तर कोरोना महामारीमुळे सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास अनिमितता झाली .
यामुळे सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे संपुर्ण वेतन हे राज्य शासनांकडून निर्गमित होणेबाबत , जानेवारी मध्ये निर्णय घेण्यात आला , त्यानंतर जुन 2024 पर्यंत वेतन नियमित झाले , परंतु त्यानंतर लाडकी बहीण योजनाच्या अंमलबजावणीकरीता सदर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाहीत .
निधी अभावी माहे जुलै महिन्यांपासून सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत , तर पुढील डिसेंबर महिन्यांपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याची शक्यता असल्याने सदर कर्मचाऱ्यांचे सिबील स्कोअर बिघडलेला आहे , त्यामुळे सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सरचिटणीस बुवा यांनी सांगितले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.