Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme paripatrak ] : राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती / जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्यानुसार नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , नाशिक जिल्हा परिषद मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक दिनांक 04.02.2024 रेाजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 02.02.2024 रोजीच्या संदर्भिय शासन निर्णयानुसार , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी पेन्शन येाजना लागु करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .

यानुसार दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन येाजना लागु करण्यात आली आहे . संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागु करण्याचा पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याचा दिनांकापासुन 06 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी या 06 महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करण्याचा पर्याय देणार नाहीत . त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागु राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

याकरता आवयक असणारे कागदपत्रांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबतचा विनंती अर्ज , विकल्प अर्ज , जाहीरातीची छायांकित प्रत , प्रथम नियुक्ती आदेश छायांकित प्रत , शाळा प्राप्त / रुजु आदेश छायांकित प्रत , सेवा पुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत , एनपीएस खाते क्रमांक छायांकित प्रत आवश्यक असणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *