लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कार्यरत कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 4 जुलै 2023 रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे . या आंदोलनांमध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी पुन्हा एकदा सहभाग घेणार आहेत , जाणून घ्या आंदोलनाचा सविस्तर रुपरेषा .
दि.14 मार्च 2023 रोजी राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी , निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता बेमुद संपावर गेले असता , तीन महिन्यांच्या आत जुनी पेन्शन बात निर्णय घेवू या अटींवर राज्य कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता . तीन महिन्यांचा कालावधी हा दिनांक 14 जुन 2023 रोजी संपत असतानाच राज्य शासनांकडून पेन्शन निर्णयास एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे .
एक महीन्यांची मुदतवाढ दिल्याने , कर्मचाऱ्यांमध्ये काही अंशी नाराजगी दिसून येत आहे . यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे , परंतु या आंदोलनाची रुपरेषा वेगळी असणार आहे . राज्य कर्मचारी दिनांक 04 जुलै 2023 रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने करण्यात येणार आहेत . या दिनांस राज्य कर्मचाऱ्यांकडून मागणीदिन म्हणून पाळला जाणार आहे .
त्याचबरोबर राज्य शासनांस कर्मचारी संघटनेकडून जुनी पेन्शनसह इतर 17 मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहेत .अशी माहीती जुनी पेन्शन संघटनेच्या नाशिक शाखेकडून माहीती देण्यात आली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !