Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee NPS Contrubution GR ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामध्ये दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांना कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 27.02.2009 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु करण्यात आली होती .
वित्त विभागाच्या दिनांक 06.04.2015 रोजीच्या शासन निणर्यानुसार , राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत स्तर – 1 ची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे . त्याच धर्तीवर राज्यतील कृषी विद्यापीठे व त्यंच्याशी संलग्न अनुदानित संस्था मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना NPS योजना स्तर – 1 लागु करण्याची कार्यपद्धती कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 31.07.2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आली आहे .
त्यानुसार राज्य शासनांच्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी असलेल्या अधिकारी तसेच कर्मचारी यांचे माहे मार्च 2023 पर्यंतची नियोक्ता व कर्मचारी हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांमध्ये हस्तांतरीत करण्यासाठी वित्तीय सल्लागार , महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या दिनांक 12.10.2023 रोजीच्या पत्रानुसार , रुपये 321,30,52,161/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती . सदरची निधी वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार आता राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असणारे शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी हे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत ( NPS ) समाविष्ट झालेले आहेत . त्यानुसार सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनांमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम , त्यावरील शासनाचे अंशदान व व्याज अशी एकुण रुपये 321,30,52,161/- एवढी रक्कम केंद्रीय अभिलेख देखभा अभिकरण ( NSDL ) कडे वर्ग करण्याकरीता कार्यवाही करण्यात येत आहे .
विद्यापीठ निहाय वितरीत करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | विद्यापीठाचे नाव | वितरीत निधी ( रुपये ) |
01. | महात्मा फुले विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर | 79,51,98,152 |
02. | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला | 81,54,71,246 |
03. | डॉ.बाळासाहेब कोकण विद्यापीठ दापोली | 83,01,80,623 |
04. | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी | 77,22,02,140 |
एकुण निधी | 321,30,52,161 |
या संदर्भात राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन विभागांकडून दिनांक 09.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.