राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट ! परिपत्रक निर्गमित दि.19.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee March month Payment good Update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक प्रशासन अधिकारी ( आस्थापना ) शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

पुढील महिन्यात दिनांक 10 ते 11 एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवाचा रमजान ईद सण व दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागांकडून परिपत्रक निर्गमित माहे मार्च 2024 चा वेतन वरील सणापुर्वी एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात  कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरीत निर्गमित करण्यात आलेले आहेत .

सदर परिपत्रकानुसार , श्री.साजिद निसार अहमद संस्थापक आखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ मालेगाव यांचे दिनांक 18.03.2024 रोजीच्या निवेदनाच्या संदर्भ देवून राज्यातील शिक्षण आयुक्तालय मार्फत येणारे सर्व विभागीय कार्यालयांना सुचित करण्यात आलेले आहेत कि , सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च 2024 चे वेतन एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात होणेबाबत ,

यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कळविण्याचे निर्देश प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकातील सुचना राज्याचे मा.शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय , पुणे , तसेच मा. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment