खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2023 पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढ ,बाबत मुख्यमंत्र्याकडे नस्ती सादर !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत , वित्त विभागांकडून मुख्यमंत्र्याकडे नस्ती सादर करण्यात आल्याची आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे . काल दिनांक 22 जून 2023 रोजी अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठकीदरम्यान मुख्य सचिवांना डी.ए बाबत विचारणा केली असता , नस्ती सादर केली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले  .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी – निमसरकारी ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता , डी.ए फरकासह लागु करणेबाबत वित्त विभागांकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव नस्ती मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेली आहे .

महिना अखेर निर्गमित होणार शासन निर्णय – माहे जुन महिना अखेर म्हणजेच दि.30 जुन पर्यंत  महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे . कारण मुख्य सचिवांनी बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे , डी.ए वाढीबाबची वित्त विभागांकडून संपर्ण मंत्रालयीन कामकाज पुर्ण करुन नस्ती सादर करण्यात आली आहे .

दिनांक 22.06.2023 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती , या बैठकींमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे  , सातवा वेतन आयोग थकबाकीचा पाचवा हप्ता देणे ,आगाऊ वेतनवाढ लागु करणे अशा विविध 24 मागण्यांवर दि.22.06.2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत आयोजित बैठकीमध्ये  सकारात्मक चर्चा झाली .

बैठकींमध्ये झालेल्या 24 मागण्या जाणून घेण्यासाठी / बैठकीमध्ये चर्चा झालेले विषय याबाबत सविस्तर बैठकीचे इतिवृत्त जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

बैठकीचे सविस्तर इतिवृत पाहा

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment