Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय / निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .

माहे जुलै 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढ : दि.01 जुलै 2023 पासून राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ हा महागाई भत्ता फरकासह लागु करण्यात येणार आहेत .

डी.ए वाढीचा प्रस्ताव अंतिम टप्यात : राज्य शासनांच्या वित्त मंत्रालयाकडून राज्यातील वरील नमुद कर्मचाऱ्‍यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करणेबाबतचा प्रस्ताव हा अंतिम टप्यात असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे . कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वी महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत , राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून लवकरच अधिकृत्त घोषणा होण्याची शक्यता आहे .

अधिकृत्त शासन निर्णयासाठी उद्यापर्यंत मुदत : मिडीया रिपोर्टनुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा उद्यापर्यंत निर्गमित होण्याची मोठी शक्यता आहे . ज्यामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना जुलै 2023 पासून एकुण 46 टक्के प्रमाणे डी.ए फरकासह लागु करण्यात येईल .

दिवाळी सणापुर्वी महागाई भत्ता वाढ करुन राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी सणाची भेट राज्य शासनांकडून देण्यात येईल , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनात तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *