लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याचा पगार हा लाभदायक ठरणार आहे . जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव आर्थिक लाभ मिळणार आहेत , या संदर्भात राज्य शासनांकडून वेळोवेळी परिपत्रके / शासन निर्णये निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते : सातवा वेतन आयोगाचा पहिला / दुसरा / तिसरा व चौथा हप्ता बाकी असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सदर उर्वरित हप्ते जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यांच्या वेतन देयकासोबत अदा करणेबाबत राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर देयके सादर करण्यासाठी पावसाळी अधिवेशनांमध्ये वाढीव निधीची तरतुद करण्यात आली आहे .
वाढीव डी.ए / डी.ए फरकाचा लाभ : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ता / महागाई भत्ता फरकाचा लाभ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 29 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर निर्णयानुसार , राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के ( 42 टक्के दराने ) डी.ए लाभ जुन महिन्यांच्या देयकापासून लागु करण्याचे आदेश देण्यात आले होते .
परंतु शासन निर्णय विलंबाने निर्गमित झाल्याने, शालार्थ प्रणालीवर 42 टक्के डी.ए अद्यावत न झाल्याने , कोषागार कार्यालयांकडून वाढीव 4 टक्के लाभ व जानेवारी पासूनचा डी.ए थकबाकी फरकाची रक्कम जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत .
त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिनांक 01 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ ( Increment ) लागु करण्यात येणार आहे , यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात तसेच महागाई भत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे .
त्याचबरोबर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता ( HRA ) मुख्यालयी राहत नसल्याने कपात करण्यात आलेले होते , अशा सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिलासा दिल्याने , जुलै महिन्यांच्या वेतनासोबत HRA चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !