Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee joining after retirement date new gr ] : राज्यातील शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेताना मासिक परिश्रमिकात सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 23.09.2024 सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील मासिक परिश्रमिकाच्या तरतुदीत , शासन निर्णय दिनांक 08 सप्टेंबर 2023 नुसार सुधारणा करण्यात आली आहे .
तथापि राज्य शासनांच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून , सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर 2016 नुसार सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन निश्चित केलेले मासिक परिश्रमिक हे दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासुन सुधारणा करण्यात यावी अथवा कसे याबाबत विचारणा होत आहे .
राज्य शासनांच्या सा.प्र.वि.शासन निर्णय दि.08.09.2023 रोजीच्या निर्णयात अधिक स्पष्टता येण्यासाठी पुढीलप्रमाणे स्पष्टता करण्यात येत आहेत .दिनांक 08 सप्टेंबर 2023 पुर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या , परंतु दिनांक 08.09.2023 रोजी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक परिश्रमिक सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय , दिनांक 08.09.2023 निर्णयानुसार , दिनांक 08 सप्टेंबर 2023 पासुन निश्चित करण्यात यावेत .
तसेच दिनांक 08 सप्टेंबर 2023 पुर्वी करार पद्धतीने नियुक्त झालेल्या , परंतु दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी कार्यरत असलेल्या तथापि या शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दिनांकापर्यंत करार संपुष्टात आलेल्या अधिकाऱ्यांचे मासिक परिश्रमिक सामान्य विभाग , शासन निर्णय दिनांक 08 सप्टेंबर 2023 नुसार निश्चित करुन त्यांना दिनांक 08 सप्टेंबर 2023 पासुनची थकबाकी अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.