Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay Dated 04.03.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक 06.02.203 च्या परिणामकारण अंमलबजावणीबाबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देणे संदर्भात अनुसरावयाची कार्यपद्धती संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजीच्या निर्णयानुसार त्रुटीपुर्तता झालेल्या शाळा / तुकड्यांना 20 टक्के / 40 टक्के अनुदान यापुर्वी 20 टक्केव 40 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा / तुकड्यांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुर करणे तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / तुकड्या , वर्ग / अतिरिक्त शाखा यांना अनुदानाकरीात पात्र घोषित करुन 20 टक्के अनुदान मंजुर करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयातील अटी व शर्ती मा.मंत्रीमंडळाच्या मान्यतेने विहीत करण्यात आलेल्या आहेत . सदर शासन निर्णयाची संबंधितांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या करण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक दि.24.04.2023 नुसार शालार्थ आयडी देण्यासाठी अनुसरावयाची कार्यवाही विहीत करण्यात आलेली आहे . मात्र सदर शासन परिपत्रकातील नमुद 01 ते 12 पुरावे हे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागु असणार आहेत . तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदर परिपत्रकातील इ.10 वी , 12 वी च्या परीक्षा मंडळाशी संलग्नित कामकाजाचे आदेश इ.

विविध शासकीय प्रशिक्षणासाठी किमान 03 वेळा पाठविले असल्यास सदर प्रशिक्षणाचे प्रशिक्षण आदेश प्रशिक्षणातील हजेरी पत्रक , उपस्थिती प्रमाणपत्र , कार्यमुक्ती आदेश इ.दस्तऐवज व नियुक्तीच्या वर्षापासून वार्षिक निकाल पत्रावर शिक्षक / वर्गशिक्षक म्हणून असलेल्या नोंदी या तीन बाबी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाशी फारसा संबंधि येत नसल्याने , या तीन बाबी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी पुरावा कागदपत्रे म्हणून ग्राह्य धरणे अडचणीचे होणार आहेत . या करीता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता तपासताना ,दि.24.04.2023 रोजीच्या शासन परिपत्रक , दि.24.04.2023 मध्ये नमुद कार्यपद्धतीनुसार प्रथम टप्पा कार्यपद्धती अवलंबिण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , त्यानंतर टप्पा क्र.03 नुसार खाली नमू केलेल्या 08 कागदपत्रांपैकी किमान 04 कागदपत्रे उपलब्ध होत असल्यास , त्याची खात्री करुन शालार्थ आयडी देण्यात यावे असे निर्देश आहेत .

01.शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी करताना वैयक्तिक मान्यता देण्याच्या वर्षाच्या जावक – नोंदवह्या उपलब्ध होत नसल्यास , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वर्षाची युडायस प्रपत्रातील माहिती , त्यानंतरच्या वर्षामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी नाव नोंद , तसेच नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्ष पुर्ण होण्यापुर्वी करण्यात आलेली बिंदुनामावली मधील कार्यरत कर्मचारी नोंद , त्यानंतर नियुक्तीच्या दिनांकापासूनचे हजेरीपत्रक , सदरचे हजेरीपत्रक केंद्र प्रमुख , शिक्षण विस्तार अधिकारी , गट शिक्षणाधिकारी , शिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान प्रमाणित केलेले असणे आवश्यक असणार आहेत .

नियुक्तीच्या दिनांका लगतच्या वर्षांमध्ये शासकीय कामकाजासाठी नियुक्ती केली असल्यास , उदा.जनगणना , पशुगणना , निवडणुक कार्यक्रम या शासकीय नियुक्ती केलेली असल्यास , उदा.पशुगणना , जनगणना निवडणुक कार्यक्रम या शासकीय कामाकाजासाठी सेवा अधिक्रहीत केल्याबाबतचे  कागदपत्रे इ.अभिलेखे नमुद आहेत . तसेच शिक्षक पोर्टलवर करण्यात आलेली नोंद ग्राह्य धरण्यात येईल .

तसेच नियुक्ती वर्ष अथवा लगतच्या वर्षाची तसेच त्यानंतरच्या वर्षाची सेवा ज्येष्ठता यादी , सदर यादी शासकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेली असणे आवश्यक असेल . तसेच नियुक्ती शैक्षणिक वर्ष व त्यानंतरच्या शैक्षणिक वर्ष संच प्रपत्रातील कार्यरत कर्मचारी प्रमाणित यादी प्रपत्र नमुद आहे . तसेच वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाची आवक शाखेतील नोंद नमुद आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 06 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *