राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.11.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण निर्णय !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee imp gr dated 11 October ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत . यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन करीता अनुदान तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे , या बाबी अंतभुत आहेत .

महिला व बाल विकास विभाग : राज्य महिला व बाल विभागातील सन 2024-25 या वित्तीय वर्षाकरीता महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डास निवृत्तीवेतन व वेतनेतर बाबींकरीता निधींचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . या करीता एकुण 727.00 लक्ष ( अक्षरी – सात कोटी सत्तावीस लक्ष रुपये मात्र ) इतका निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.11.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार विभागातील शाळा / महाविद्यालये मधील कार्यरत शिक्षक / कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले आहेत .

सुधारित आश्वासित प्रगती योजना : राज्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक येथील आस्थापनेवरील शासन मंजूर पदावर कार्यरत पात्र शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांना पुर्वलक्षी प्रभावाने दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

नगर विकास विभाग , रोजंदारी कर्मचारी नियमितीकरण : कोल्हापुर महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संख्येएवढी अधिसंख्य पदे निर्माण करुन त्यांच्या सेवा ह्या महानगरपालिकेच्या आस्थापनेवार नियमित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

वरील सर्व ( चारही ) शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्याकरीता Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment