Live marathipepar , संगिता पवार [ State Employee IMP Shasan Nirnay ] : शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्टया सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने केलेल्या शिफारशीस अनुसरुन सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी राज्यातील १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी वित्त विभाग दिनांक 17.10.2023 मधील शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे.
तदनंतर सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचा समावेश सन २०२३ – २४ या वित्तीय वर्षासाठी उपरोक्त वाचा मधील ४ समोर नमूद शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या यादीमध्ये करण्याची शिफारस वित्त विभागास केली आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 17.10.2023 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
सदर शासन पुरकपत्रानुसार , उक्त प्रस्तावनेमध्ये नमूद वस्तुस्थितीस अनुसरुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचा समावेश सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी वित्त विभाग, दि. १७ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या यादीमध्ये करण्यास या शासन पूरकपत्रान्वये मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन २०२३ – २४ या वर्षाकरीता शासकीय बँकींग व्यवहार करण्यास तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र निर्गमित झाल्यापासून एका महिन्याच्या आत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वेतन व निवृत्तीवेतन प्रदानाकरीता शासनासोबत आवश्यक करार करणे अनिवार्य राहील.
या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.