Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee finance department imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त आखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून दिनांक 23 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व आखिल भारतीय सेवा मधील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरीता सुरु असलेल्या वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या विमाछत्र योजनेचे दिनांक 25.07.2024 ते दिनांक 24.07.2025 या कालावधीसाठी नुतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे . सदर वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी तसेच आखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नाही .
तर स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन संबंधित अधिकारी / कर्मचारी तसचे निवृत्तीवेतनधारक या योजनांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत . तसेच या योजनांमध्ये केवळ दिनांक 01 जुलै 2024 ते दिनांक 30 जून 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले / होणारे अधिकारी / कर्मचारी आणि आखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनांमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत . त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनांमध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नुतनीकरणास पात्र ठरणार आहेत .
त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या विमाछत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याची प्रमाणे कमी होत असल्याने सन 2024-25 मध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा , याकरीता कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या करीता वयोगट 18-38 वर्षे , 36-45 वर्षे , 46-58 वर्षे व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्यांच्या दरांमध्ये बदल करण्यात येत आहेत .
या योजना अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पुर्वअट लागु होणार नाही , त्याचबरोबर या योजनेत समावेश करतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांनाही विमाछत्र उपलब्ध असणार आहेत .
सदर विमा धारकास कोणत्याही PPN रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची मुभा असणार आहे , तसेच विमा कंपनीच्या PPN पॅकेजेसच्या दराप्रमाणे दिली जाणार आहे . तर PPN बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचे स्वातंत्र्य विमा धारकास असणार आहेत , अशा प्रकरणी विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार , रुग्णालयाची अर्हता तपासुन कंपनी दावा पारित करेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयांमध्ये वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम तसेच विमा छत्र रक्कम नमुद करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..