कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिमचे 12500/- अनुदान वाटप करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.07.10.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee divali festival advance ] : सन 2024-25  या चालु वर्षात अंतर्गत दिवाळी सणाच्या निमित्ताने सण अग्रीमचे अनुदान वाटप करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक जिल्हा परिषद जळगाव मार्फत दि.07.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , जि.प स्तरावरील व पंचायत समिती स्तरावतील वर्ग – 3 व वर्ग 4 ( कार्यालयीन आस्थापना ) तसेच पंचायत समिती स्तरावतील ग्राम सेवक / ग्राम विस्तार अधिकारी ( ग्राम पंचायत आस्थापना ) यांचे करीता दरवर्षी दिवाळी ह्या सणानिमितत्त अग्रीमाचे वाटप प्रत्येकी कर्मचारी निहाय मंजूर अनुदान रक्कम 12500/- प्रमाणे वाटप करण्यात येते .

त्याप्रमाणे गेल्या वर्षी सन 2023-24 ह्या आर्थिक वर्षात कार्यालयातील ऐच्छिक असणारे कर्मचारी तसेच वेतन धारक ग्राम सेवक / ग्राम विस्तार अधिकारी यांना दिवाळी सणाच्या निमित्त करण्यात आलेली अनुदान मागणी पत्र हे वेळीच संबंधित विभागास सादर झाले नाही परिणामी ते उशिराने प्राप्त झालल्या कारणाने व अनुदान अभावी वर्ग – 3  व वर्ग – 4 कर्मचारी तसेच ग्राम सेवक / ग्राम विस्तार अधिकारी यांस दिवाळी सण अग्रीम अनुदान ऐनवेळी वितरीत करता आले नाही असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच चालु वर्ष सन 2024-25 या आर्थिक वर्षात जि.परिषद मधील इच्छुक असणारे कर्मचारी , पंचायत समिती स्तरावरील ग्राम सेवक / ग्राम विस्तार अधिकारी जे इच्छुक आहेत असे कर्मचारीच्या प्रत्येक संख्येनिहायच गुणिले सण अग्रीम मंजूर अनुदान रक्कम 12500/- प्रमाणे आवश्यक तेवढीच लागणारी रक्कम ही अनुदान मागणी पत्र कार्यालय प्रमुख मार्फत सादर करण्याचे‍ निर्देश देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये सण अग्रीम घेण्यास इच्छुक कर्मचारी , तसेच सण अग्रीम इच्छुक असणारी कर्मचारी यांची एकुण संख्या व लागणारी रक्कम 12500/- प्रमाणे अनुदान नमुद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच एकुण एकंदरीत आवश्यक असणारी रक्कम नमुद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment