राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात महत्वपुर्ण माहिती ( सेवा नियम 12 ) जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtara State Employee Seva niyamavali Rule 12 ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम 12 मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजांमध्ये जगत असताना काही गोष्टींचा वावर घालावा लागते . याबाबत सविस्तर सेवानियम 12 पुढीलप्रमाणे पाहूयात ..

राज्य शासकीय कर्मचारी हा त्याच्या  कार्यालयीन कामकाज असणाऱ्या कोणत्याही कर्मचारी अथवा औद्योगिक / वाणिज्यीक संस्था / तत्सम मंडळाकडून / कामकाजांशी संबंधित व्यक्ती यांच्या कडून मुक्त हस्ताने केलेला पाहूणचार अथवा वारंवार करण्यात आलेला पाहुणचार स्वीकारणार नाही .

तसेच सरकारी कर्मचारी अथवा त्यांचे कुटुंबिय कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारणार नाहीत , यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांशी कोणताही कार्यालयीन व्यवहार न करणारा नातेवाईक / खाजगी मित्र या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने देवू केलेली विनामुल्य वाहतुक , भोजन व्यवस्था , अथवा इतर सेवा ते स्वीकारणार  नाहीत अथवा कोणताही अन्य आर्थिक लाभ घेण्यात येणार नाही .

त्याचबरोबर विवाह  अंत्यसंस्कार अशा धार्मिक समारंभा प्रसंगी शासकीय कर्मचारी त्याच्या नातेवाईकांकडून देणग्या स्वीकारु शकतील . परंतु अशा देणगीचे मुल्य मर्यादीत स्वरुपात घेता येईल . यांमध्ये गट अ अधिकाऱ्याना 25,000/- रुपये पेक्षा अधिक , गट ब अधिकाऱ्यांच्या बाबतीत 15000/- रुपये अधिक देगणी तसेच गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 7500/- रुपये पेक्षा अधिक देणगी असल्यास तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देणगी रक्कम ही 1000/- पेक्षा अधिक असल्यास , याबाबतची माहिती शासनास कळविणे आवश्यक आहे .

तर इतर प्रसंगी सरकारी कामाशी संबंध नसणाऱ्या वैयक्तिक मित्रांकडून देणग्या स्विकारु शकतील पंरतु अशा देणग्यांचे मुल्य हे गट अ व ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बाबतीत 1500/- पेक्षा अधिक असल्यास , तर गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1000/- पेक्षा अधिक असल्यास तर गड ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 500/- रुपये पेक्षा अधिक असल्यास , सदरची माहिती शासनांस कळविणे आवश्यक असते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment