Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee DA Increase Paid In Jully Month News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा जून पेड इन जुलै वेतन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी शक्यता समोर येत आहे . कारण राज्यांमध्ये दिनांक 4 जुन पर्यंत आचार संहिता असणार आहेत , त्यानुर राज्य शासनांकडून अधिकृत्त निर्णय घेतला जाईल .
राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2024 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे , यांमध्ये माहे जानेवारी ते मे महिने या पाच महिने कालावधीमधील डी.ए फरक देखिल अदा करण्यात येणार आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डी.ए लाभ मिळत आहे , तर 4 टक्के डी.ए वाढीने राज्यातील कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने डी.ए लाभ मिळेल .
याबाबत पुढील महिन्यांत लोकसभा निवडणूका नंतर राज्य मंत्रीमंडाची कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक आयोजित करण्यात येईल , सदर बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डी.ए बाबत अधिकृत्त निर्णय होण्याची शक्यता मिडीया रिपोर्टनुसार समोर येत आहे .
जुलै 2024 मध्ये परत वाढणार डी.ए : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोनदा डी.ए वाढ करण्यात येते , राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी डी.ए वाढ अद्याप बाकी आहे , तर परत जुलै मध्ये आणखीण डी.ए वाढ लागु करण्यात येईल .सदर डी.ए वाढीचा लाभ हा राज्यातील सेवानिवृत्त पेन्शन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाधारकां देखिल लागु होते .
घरभाडे मध्ये होणार मोठी : सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या एच आर मध्ये अनुक्रमे 1 टक्के , 2 टक्के व 3 टक्के अशी वाढ होणार आहे . म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के अशी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.