Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Increase Good News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ चार महिन्यांतील महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , वित्त विभागांकडून मान्यता देण्यात आल्याची वृत्त समोर येत आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासुन डी.ए फरकासह वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आला आहे , याच पार्श्वभुमीवर राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर व ऑक्टोंबर या चार महिन्यातील महागाई भत्ता फरकास नोव्हेंबर महिन्यांतील वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव चार टक्के महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .
वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार व मंजुरी : राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी.ए लागु करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , सदर प्रस्तावास वित्त विभागाची मंजुरी देण्यात आली आहे .तर सदर प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना 9 टक्के डी.ए वाढ : राज्यातील सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्या सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना जुलै 2023 पासून 9 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहेत , ज्यामुळे सदर असुधारित वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 221 टक्के वरुन 229 होईल .
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.