Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee benefit before election ] : राज्यातील विधानसभा निवडणुक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे , त्यापुर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याचे माहिती समोर येत आहे .
पेन्शन लाभ : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागु करण्यात आली आहे , परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने , राज्य शासनांकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनांची युनिफाईड पेन्शन योजनांचा अभ्यास करुन ज्या योजनांमध्ये सर्वाधिक लाभ होईल , अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहेत .
सदर पेन्शनचा मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिली जाण्याची शक्यता आहे , युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतुद आहे , परंतु त्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायमस्वरुपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे .
वेतनत्रुटी ( New Pay Scale ) : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगातील वेतनत्रुटी दुर करण्यासाठी , राज्य शासनांकडून वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आलेले आहेत , सदर समितीकडून राज्यातील ज्या पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेले आहेत , अशा पदांच्या वेतनत्रुटी मध्ये सुधारण करणेबाबत , सदर समितीला दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे .म्हणजेच सदर सुधारित वेतनश्रेणीचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपुर्वीच मिळण्याची शक्यता आहे .
वाढीव महागाई भत्ता लाभ : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 चा वाढीव महागाई भत्ता बाबतचा निर्णय या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे , म्हणजेच निवडणुकीपुर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन , वेतनत्रुटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारचे लाभ मिळू शकतो ..