Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणबाबत राज्य शासनांस वेळोवेळी पत्र सादर करण्यात येत असल्याचे उपसंचालक ( कोषा ) संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्याचे अधिदान व लेखाधिकारी यांच्या निदर्शनास आणुन दिले असता , राज्याचे अवर सचिव वित्त विभाग यांच्याकडून याबाबत सविस्तर उत्तर देण्यात आलेले आहेत .

दीर्घ सुटी विभागासाठी नियम 54 खाली जमा होणारी अर्जित रजा व शासन निर्णय दिनांक 06.12.1996 नुसार जमा होणारी अर्जित रजा या दोन्ही स्वतंत्र बाबी असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्याला सदर नियम व शासन निर्णयान्वये अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण करावे असा कोणताही शासन निर्णय नाही .

त्यामुळे दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय ठरत नाही . सबब दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम 1981 मध्ये अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेयतेबाबत तरतूद नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

यास्तव सदर संवर्गांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेचे रोखीकरण देय ठरणार नाही असे संचालक लेखा व कोषागारे कार्यालय मुंबई व संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांच्या निदर्शनास आणून द्यावेत असे सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *