Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत वित्त विभागाचा अधिकृत्त GR पुढील दोन दिवसांत निर्गमित होण्याची मोठी बातमी समोर येत आहे . माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव डी.ए अदा करण्यात येणार असल्याची चर्चा समोर येत असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये डी.ए वाढीबाबत अधिकृत्त GR निर्गमित होण्याची मोठी शक्यता आहे .

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय – निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्तामध्ये दिनांक 01 जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ बाबतचा शासन निर्णय प्रलंबित आहे .राज्याच्या मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार , डी.ए वाढी संदर्भात वित्त विभागाने तयार करण्यात आलेली नस्ती ही मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आली आहे .

सदर नस्तीवर उद्या किंवा परवा दिनांक 30 जुन 2023 पर्यंत डी. ए वाढीसंदर्भात वित्त विभागाचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल , ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत वाढीव 4 टक्के लागु करण्यात येईल .

तसेच जर सदर शासन निर्णयांमध्ये जानेवारी ते मे महिन्यांच्या डी.ए फरक अदा करण्याची तरतुद असल्यास , जुन महिन्यांत चार टक्के डी.ए वाढीसह डी.ए फरकाची मोठी रक्कम मिळेल .सध्या राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार 38 टक्के प्रमाणे डी.ए मिळत आहे . आता त्यात आणखीण चार टक्क्यांची वाढ होणार असल्याने , एकुण डी.ए हा केंद्र सरकारप्रमाणे 42 टक्क्यांवर जावून पोहोचणार आहे .यामुळे आता सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे संपुर्ण लक्ष हे 4 टक्के डी.ए वाढीच्या अधिकृत्त शासन निर्णयावर लागले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *