राज्य कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रवर्ग ठरविणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र ! सविस्तर राजपत्र पाहा !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार , शासन राजपत्र : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रवर्ग ठरविणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र दिनांक 24.03.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर राजपत्र हा महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी अधिनियम 1977 यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन पुढीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात आलेली आहे .

सदर शासन राजपत्रानुसार क प्रवर्गांमध्ये 50 टक्के गुणांसह मानव्य शास्त्र / विज्ञान / सामाजिक शास्त्र / भाषा विषयांतील पदवी आणि 50 टक्के गुणांसह एम.एड किंवा एम.ए शिक्षणशास्त्र मधील अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अथवा एम.एस.सी /एम.म/एम.कॉम ,बी.टी/बी.एड किंवा बी.ए /बी.कॉम/बी.ए /बी.एड अर्हता किंवा समकक्ष अर्हत उत्तीर्ण असणारे ..

किंवा बी.ए /बी.एस्सी /बी.ए किंवा समकक्ष या सोबत पाच वर्षााचा अनुभवानंतर वरिष्ठ हिंदी शिक्षक सनद किंवा दहा वर्षांच्या अनुभवानंतर कनिष्ठ हिंदी शिक्षक सनद असणारे कर्मचारी यांचा समोवश करण्यात आला आहे .तर कला शिक्षकांसाठी बी.ए / बी.एस.सी ./बी.कॉम /बी.एफ /जी.डी आर्ट पदविका / ए.एम प्रमाणपत्रासह एएम डिप्लोमा /डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन उत्तीर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे .

तर प्रवर्ग क , ड अथवा ई मध्ये समावेश होणेसाठी नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने त्या त्या प्रवर्गाकरीता प्रकरणपरत्वे प्रशिक्षित शिक्षकास आवश्यक असलेली अर्हत धारण करणे आवश्यक असणार आहेत .तर प्रवर्ग फ , ग  किंवा ह मध्ये समाविष्ट असणारे एखादे शिक्षकाने सेवेत असताना प्रकरणेपरत्वे प्रवर्ग क , ड किंवा ई प्रवर्गात अंतर्भुत असलेल्या प्रशिक्षित शिक्षकांसाठीची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केल्यास संबंधित शिक्षकांचा समावेश त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार प्रशिक्षित शिक्षकांसाठी असलेल्या संबंधित प्रवर्गात करण्यात येईल .

एखाद्या प्राथमिक गटातील इयत्ता 1 ली ते 5वी  शिक्षकाने उच्च शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केली किंवा त्यात सुधारणा केली असल्यास , तथापि माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक गटासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित शिक्षक , माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक सेवा ज्येष्ठतेच्यासुची मध्ये ज्येष्ठतेचा दावा करु शकणार नाहीत , त्याच्या उच्च शैक्षणिक पात्रतेस केवळ अतिरिक्त पात्रता मानले जाईल अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करा

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment