Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state crop insurance selected district ] : महाराष्ट्र राज्यातील 18 जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे , तर सदर जिल्ह्यांमध्ये विमा वितरणांस देखिल सुरुवात करण्यात आली आहे . सदर यादीमध्ये आपल्या जिल्ह्यांचा समावेश आहे का ? याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील शेतकरी पिक विमासाठी बऱ्याच दिवसांपासुन प्रतिक्षा करीत होते , अखेर राज्य शासनांकडून पात्र जिल्ह्यांचे नावे जाहीर करण्यात आले आहेत . यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे . तसेर यावेळी पिक विमा रक्कम वितरीत करण्यासाठी काही महत्वपुर्ण बदल देखिल करण्यात आलेले आहेत .
मागील वर्षी काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस तर मराठवाडा / विदर्भासारख्या भागांमध्ये दुष्काळ पडल्याने शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . राज्यातील 33 टक्के शेतकऱ्यांना यापुर्वीच 25 टक्के अग्रीम विमा रक्कम देण्यात आलेले आहेत . उर्वरित राहीलेले 75 टक्के विमा रक्कमाची वितरण प्रक्रिया राज्य शासनांकडून सुरुवात लवकरच होणार आहे .
यांमध्ये प्रामुख्याने नाशिक , धुळे , नगर , हिंगोली , परभणी , बींड , छ.संभाजीनगर , सातारा , सांगली , धाराशिव , सोलापुर , नांदेड या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणांस सुरुवात होणार आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून निर्णय देखिल जाहीर करण्यात आलेला असून , पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यांपासुन सदर विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे येईल असा अंदाज आहे .
सदरचा पिक विमा मागील वर्षाच्या खरीप च रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा दिला जाणार आहे . याकरीता आपल्या मागील वर्षी पिकांची झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरच खात्यावर मिळणार आहे . विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सदर विमा रक्कम मंजूर केली जाणार आहे .