Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Budget ] : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानांची सांगता काल दिनांक 01 मार्च 2024 रोजी राष्ट्रगीतांने करण्यात आली . यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशांमध्ये अनेक बाबींचा विचार करुन राज्यातील सर्वच घटकांसाठी विशेष लक्ष देण्यात आलेले आहेत . कारण मोदी सरकार बरोबर हे शिंदे सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प आहे .
केंद्र सरकारकडून तब्बल 7,000 हजार कोटींचे अनुदान राज्याला : केंद्र सरकारने राज्य सरकारला तब्बल 7,000 हजार कोटींचे अनुदान राज्य सरकारला दिले आहेत . यामुळे राज्य सरकारला या अर्थसंकल्पांमध्ये नवनवीन विकासाची कामे करण्यास मुफा मिळाली आहे . यावेळी बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देणेकरीता विविध योजना यांमध्ये नमो शेतकरी सन्मान योजना , गरीबांना आनंदाचा शिधा , शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ तसेच एक रुपयात पिक विमा देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .
तसेच अधिवेशनांमध्ये राज्यचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर बोलताना सांगितले कि राज्यातील धनगर समाज बांधवांसाठी तब्बल 22 योजनांसाठी गेल्यावर्षी 142 कोटी रुपये इतक्या निधीची तरतुद तसेच मदत पुनर्वसन विभाग करीता 12,274 कोटी तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची तरतुद 22 हजार कोटी पेक्षा जास्त केली आहे . तसेच राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे 13 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहेत , त्याकरीता तब्बल 1270 कोटी रुपये मदत मंजूर करण्यात आलेली आहे . त्यापैकी 8,00,000/- लाख शेतकऱ्यांना 678 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असल्यचे नमुद करण्यात आलेले आहेत .
💁💁 हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलीस शिपाई, चालक पदांसाठी महाभरती 2024.
तसेच पुणे रिंग रोड करीता 60 टक्के भुसंपादनाचे काम झाले असून येत्या जुन 2024 पर्यंत भुसंपादनाचे पुर्ण काम करण्याचा सरकारचा पुर्ण मानस आहे . तसेच विरार बहुउद्देशिय वाहतुक मार्गाबद्दल 104 गावांची मोजणी झालेली असून , सदर 6,000 कोटींची निधी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . तसेच पाणंद रस्ते योजना करीता 800 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे
त्याचबरोबर सौर उर्जेला प्राधान्य देण्यासाठी तसेच मराठवाड्याच्या सिंचन करीता 2800 कोटींची तरतुद करण्यात आलेली आहे . सौर उर्जाकरीता प्राधान्य तसेच मराठवाड्याच्या सिंचन करीता 2800 कोटीची तरतुद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . त्याचबरोबर तीर्थक्षेत्र व ज्योतिर्लिंग शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना विविध कामांकरीता या अर्थसंकल्पांमध्ये तरतुद करण्यात आलेली असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली .
अर्थसंकल्पातील काही महत्वपुर्ण घोषणा : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहेत , याकरीतता आर्थिक तरतुद करण्यात आली आहे .तसेच नविन सुक्षम व लघु उद्योग धोरण लागु करण्यात येणार आहेत , ज्यांमध्ये 18 लघु उद्योग स्थापन करण्यात येणार आहेत .
- 7000 कि.मी लांबीची रस्ते सुरु करण्यात येणार आहेत , तसेच नगरविकास करीता तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे , तसेच सार्वजनिक बांधकाम करीता तब्बल 19,000 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आलेले आहेत .
- वीज पुरवठा नसणाऱ्या राज्यातील तब्बल 37,000 अंगवाड्यांना आता सौरउर्जा संच देण्यात येणार आहेत .
- राज्यात शेतकऱ्यांकरीता मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजनांस सुरुवात करण्यात येणार असून , या अंतर्गत 8,50,000 ऐवढे नवे सौर कृषी पंप बसविण्यात येणार असल्याची मोठ घोषणा करण्यात आली .
- तसेच महिलांकरीता तब्बल 5 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत , तसेच हर घर जल या योजनांच्या माध्यमातुन तब्बल 1 कोटी इतके नळ जोडण्यात येणार आहेत .
- रत्नागिरी येथे भगवत बंदर विकसीत करण्याकरीता 300 कोटी तर जालना – यवतमाळ – पुणे – लोणावळा रेल्वे मार्ग तयार करणे करीता राज्य शासन 50 टक्के रक्कम देणार आहे .
- छत्रपती संभाजीनगर विमातळाचा विस्तार करण्याकरीता विशेष आर्थिक निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .