Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state budget for farmer ] : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प काल दिनांक 28 जुन 2024 विधानसभेत मांडला , सदरच्या अर्थसंकल्पांमध्ये पंढीरीच्या वारीपासून ते राज्यातील शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत अशा सर्व समाज घटकांना दिलासा तसेच न्याय देणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहेत .

सदरच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन राज्य शासनांकडून सन 2023-24 या सालाच्या खरीप हंगामातील कापुर तसेच सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने , अशा शेतकऱ्यांना यापुर्वी घोषणा केल्याच्या प्रमाणे , सन 2023-24 मधील खरीप हंगामातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000/- रुपयांची मदत देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे .

मागेल त्याला पंप देणे , मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजना , तसेच 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना आता पुर्णपणे मोफत वीज देणे , तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याकरीता खास अनुदान , शेती क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यासाठी संशोधन करण्यास 100 कोटींचा विशेष निधी , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता ,

 तसेच जलयुक्त शिवार टप्पा 2 साठी 650 कोटींचा निधी , एक रुपयात पीक विमा योजनेत ई- पंचनाम प्रणाली , शेत मालाकरीता गाव त्या ठिकाणी गोदाम योजनेस 341 कोटी रुपये अशा विविध प्रकारच्या दिलासादयक निर्णय सदर अर्थसंकल्पांमध्ये घेण्यात आलेले आहेत , यामधून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक तसेच योग्य न्याय मिळाला आहे .

तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनांमधील सर्व 82 वसतिगृहे उभारण्यास देखिल सदर अर्थसंकल्पांमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे .तसेच राज्यात जलयुक्त शिवार अभियान – 2.0 करीता 650 कोटी रुपयांची निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *