राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या 7 व्या आयोगानुसार विविध भत्त्यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state bmc employee allowance increase from September month] : राज्यातील मुंबई महानगरपालिकाच्या अधिकारी / कर्मचारी यांना  सातवा वेतन आयोगानुसार  ( 7th pay commission) विविध भत्त्यामध्ये वाढ करण्यास , प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे .

सदर वाढीव भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर 2024 पासून फरकासह देण्यात येणार आहे . यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांना रजा प्रवास सहाय्य , प्रवास  भत्ता त्याचबरोबर पदाची संलग्न असणारे विविध भत्ते तसेच दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनाकरिता विशेष भत्ता , मुलांच्या शिक्षणाकरिता भत्ता यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे .

सदर विविध भत्त्यामध्ये वाढ करणेबाबत , प्रशासनाकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आले होते . परंतु यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती . नुकतेच सदर प्रलंबित प्रस्तावर पालिका प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे , यामुळे सदर अधिकारी /  कर्मचारी यांना माहे नोव्हेंबर महिन्यामध्ये निधी उपलब्धतेनुसार , सदर भत्ते वाढीव दराने मंजूर केले जाणार आहेत .

सदर भत्यातील वाढीमुळे पालिका प्रशासनावर 173 /- कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे , सदरचे विविध भत्ते माहे सप्टेंबर 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने माहे नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे .

सदर निर्णयामुळे मुंबई पालिका प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांना माहे सप्टेंबर 2024 पासून वाढीव दराने वरील नमूद विविध भत्यांचा आर्थिक लाभ थकबाकीसह मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment