Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यांमध्ये वाढ होणेबाबत , वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासांदायक शासन निर्णय दिनांक 07 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

वाहन चालकांना मिळणाऱ्या अतिकालिक भत्त्याच्या वेळेमध्ये व प्रचलित दरांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार आता राज्य शासनाने असे आदेश दिला आहे कि , शासनाचे विविध विभाग व त्याखालील निरनिराळ्या कार्यालयातील वाहन चालकांना 9 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास सदर शासन निर्णयांमध्ये दिलेल्या शर्तींच्या अधनि राहून रुपये 100/- प्रति तास दराने अतिकालिक भत्ता देण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि ,कामाच्या दिवशी 9 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास यांमध्ये भोजनांचा वेळ धरुन आणि रविवार व सुटीच्या दिवशी सुद्धा काम केल्यास दर तासाला रुपये 100/- रुपये ( यांमध्ये अर्धा तास किंमवा जास्त काम केल्यास तो पुर्ण तास धरण्यात येणार आहे . )

तसेच वाहन चालकास एका महिन्यात मिळणारी अतिकालिका  भत्त्यांची एकुण रक्कम त्यांच्या एकुण पगाराच्या 30 टक्के पेक्षा अधिक असणार नाही अशी तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच वाहन चालकांना सुधारित दराप्रमाणे अतिकालिक भत्ता मंजुर करण्याबाबतचे अधिकार पुर्वीप्रमाणेच वाहन चालक ज्यांचे नियंत्रणाखाली काम करतात त्या विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना असणार आहेत .

हे पण वाचा : अखेर आंदोलनाचा दिवस ठरला ! जुनी पेन्शन , निवृत्तीचे वय 60 वर्षे , आश्वासित प्रगती योजना , वेतनवाढ , पदोन्नती अशा विविध मागणीसाठी धरणे आंदोलन ..

सदर सुधारित दर हे सदर शासन आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकांपासुन म्हणजेच दिनांक 07.08.2023 पासुन लागु असणार आहेत .तसेच सुधारित दराप्रमाणे येणारा खर्च संबंधित विभागाच्या / कार्यालयाच्या त्या त्या लेखाशिर्षाखालील मंजुर अनुदानातून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत विधासभेत झाली चर्चा , मंत्र्याने कार्यवाही करण्याचे दिले आदेश !

या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक .07.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *