Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ School Timeing Change Shasan Nirnay ] : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4  थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 अथवा 9 नंतर भरण्याबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्याचे मा.राज्यपाल यांच्या निर्देशानुसार शालेय विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत , विचार करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या . त्यानुसार राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेवून शाळांची वेळ बदण्याविषयी अभ्यास करण्यात आला असून , सदर अभ्यास करणेकामी राज्यातील शिक्षण तज्ञ , शिक्षण प्रमी , पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखिल अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करुन देण्यात आली होती . गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता , प्राधान्याने पुढील बाबी समोर आलेल्या आहेत .

सदर बाबीमध्ये राज्यातील सर्व माध्यमे / सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषत : खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचे दिसून येत आहेत . आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली , तसेच मनोरंजनाची विविध साधने , शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेले ध्वनीप्रदुषण या मुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत , व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पुर्ण होत नाही , ज्याचा नकारात्मक परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होत असताना दिसून येत आहेत .

अशा विविध बाबींचा विचार केला असता सकाळी 9 पुर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते , यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सकाळी नऊ वाजता अथवा सकाळी 9 वाजेनंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ ही सकाळी 9 वा. अगोदरची आहे , त्या शाळांनी नविन येणारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरविणेबाबत , वेळ सकाळी 9 अथवा 9 नंतर ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *