Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state 5 district earthquake in period havaman andaj by punjabrao dakh ] : राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये काल दिनांक 10 जुलै 2024 रोजी 4.5 रिश्टर स्केल एवढ्या तिव्रतेचा भुंकप झाला , यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते . भुकंप व पावसाचा नेमका संबंध काय ? याबाबत पंजाबरावांनी दिलेल्या तातडीचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्यातील मराठवाडा विभागातील एकुण 4 जिल्ह्यांमध्ये तर विदर्भ विभागातील 01 जिल्ह्यांमध्ये काल दिनांक 10 जुलै रोजी सकाळी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत , यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते , भुकंपाबाबत सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मिडीयांमध्ये व्हायरल होत आहे . सदर भुकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही .
या जिल्ह्यांमध्ये जाणवले भुकंपाचे धक्के : मराठवाडा विभागातील जालना , नांदेड , हिंगोली , परभणी या चार जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 ते 7.30 या दरम्यानच्या कालावधीमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत . यांमध्ये हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भुकंपाची तिव्रता 4.5 रिश्टरची नोंद झाली आहे . तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत . वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भागांमध्ये भुकंपाचे तिव्रता अधिक होती .
भुकंपाचा पावसाशी काय संबंध ? पंजारावांचा तातडीचा हवामान अंदाज : पाऊस व भुकंपाचा नेमका काय संबंध आहे , याबाबत हवामान तज्ञ पंजाबरावांनी तातडीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे . पंजाबरावांनी सांगितले आहे कि , राज्यांमध्ये भुकंपाचे धक्के हे भविष्यात चांगल्या पावसाचे चिन्ह दर्शविले असे नमुद करण्यात आले आहेत .
भुंकप हे एक प्रकारे चांगल्या पावसाचे लक्षणे दर्शविते असे नमुद करण्यात आले आहेत . ज्या-ज्या वेळी भुकंपाचे धक्के बसतात , त्या- त्या वेळी चांगला पाऊस पडतो . असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे , यावेळी पंजाबरावांनी किल्लारी भुकंपाचा आठवण करत नमुद केले कि , ज्यावेळी 1993 मध्ये किल्लारी ला भुकंप झाला त्यावेळी खुप पाऊस झाला होता . तशीच स्थिती यंदा निर्माण होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !