Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state 3% DA increase gr update ] : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 03 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) थकबाकीसह लागू करणे संदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे ..
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून , सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की , राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरतीवर दिनांक 01 जुलै 2024 पासून 03 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA ) लागू करणे संदर्भातील आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावा .
जानेवारी वेतनासोबत वाढीव DA देण्याची मागणी : माहे जानेवारी 2024 च्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता (DA ) थकबाकीसह देण्यात यावी , अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आलेली आहे . म्हणजेच दिनांक 01 जुलै 2024 पासून 03 टक्के DA फरकासह डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
सदर निवेदन राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे , शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांना देण्यात आले आहेत .
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता (DA ) देण्यात येत असतो , केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवून तीन महिने झाले , तरीही राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होता . आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे , यामुळे सदर प्रलंबित निर्णय तात्काळ घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.