Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Solapur District Local Leaves ] : महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांकडून अधिसुचित केलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी स्थानिक सुट्टी जाहीर करु शकतात , हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांमध्ये मोडत असल्याने सुट्टींची मर्यादा अधिक होणार नाही , यानुसार जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर करतात .
असाच निर्णय सोलापुर जिल्ह्यासाठी घेण्यात आला आहे . सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार , मंगळवार आणि गुरुवार अशा तिन दिवसांकरीता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे . यावेळी जिल्ह्यातील राज्य शासकीय सर्व कार्यालये , तसेच शाळा – महाविद्यालये बंद असणार आहेत .यामुळे या जिल्ह्यातील कर्मचारी – विद्यार्थ्यांना 4 दिवस दीर्घ सुट्टी आनंद मिळणार आहे .
मकर संक्रांत या सणानिमित्त दिनांक 15 जानेवारी वार सोमवार , तर दिनांक 16 जानेवारी वार मंगळवार रोजी अनंत चतुर्दशी निमित्त , तर दिनांक 18 जानेवारी नरक चतुर्दशी निमित्त वार गुरुवारी अशा तीन दिवसांची स्थानिक सुट्टी करण्यात आलेल्या आहेत .
सोलापुर हा जिल्ह्यांमध्ये कानडी बोलणाऱ्यांची लोकसंख्या 30 टक्के आहे , कारण हा जिल्हा कर्नाटक राज्यांच्या लगतचा जिल्हा आहे . या ठिकाणी मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते , शिवाय नंतरचे सण देखिल मोठ्या आनंदाने साजरे केले जात असल्याने , जिल्ह्याधिकाऱ्यांनी तिन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे .