महाराष्ट्र राजकीय वर्तुळातील आत्ताच्या मोठ्या घडामोडी ; मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पदांवरुन चर्चा रंगली !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rajakiy ghadamodi about cm & deputy cm ] : महाराष्ट्र राजकीय वर्तुळातील आत्ताच्या मोठ्या घडामोडी घडत असून , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदांवरुन चर्चा अधिकच रंगत आहेत . मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दिसून येत आहेत , तर त्यांच्या वतिने 03 मोठ्या शक्यता असल्याचे सांगितले जात आहेत .

मुख्यमंत्री पद न मिळाल्यास , उपमुख्यमंत्री पदासह महत्वाची खाती : जर मुख्यमंत्री पद न मिळाल्यास , उपमुख्यमंत्री पदासह महत्वाची खाती एकनाथ शिंदे स्वत : कडे घेण्याची शक्यता दिसून येत आहेत . यांमध्ये प्रामुख्याने गृह खाते , नगर विकास खाते स्वत : ठेवण्याची शक्यता दिसून येत आहेत . यावर देखिल शिवसेनेचे आमदार राजी असल्याचे बोलले जात आहेत .

तर उपमुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्याला संधी देण्याची शक्यता : एकनाथ शिंदे हे शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेतृत्व करीत असल्याने , ते सदर पक्षाचे अध्यक्ष आहेत , या नात्याने ते सत्तेत राहण्यापेक्षा सत्तेतुन बाहेर जावून पक्षाची धुरा चालवतील अशी शक्यता आहे . तर त्याच्या जागी पक्षातील ज्येष्ठ नेते अथवा आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री पदासाठी संधी देवू शकतील असा अंदाज आहे .

एकनाथ शिंदे यांचा तिसरा पर्याय : एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या समोर स्पष्ट केल्यानुसार , सरकारला बाहेरुन पाठिंबा देवू शकतील . परंतु हे शिवसेना गटातील काहींना हे मान्य होणार नाही तर देवेंद्र फडणवीस देखिल एकनाथ शिंदे यांना नाराज करणार नाहीत हे स्पष्ट आहेत .

Leave a Comment