Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain update upto 04 November ] : राज्यामध्ये दिनांक 04 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे . तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

30 ऑक्टोबर रोजीचा अंदाज : दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोल्हापूर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील नागपूर , वर्धा, अकोला या जिल्ह्यामध्ये किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे . या दिवशी इतर जिल्ह्यांमध्ये स्वच्छ वातावरण राहणार आहे

31 ऑक्टोबरचा हवामान अंदाज : दिनांक 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील विदर्भामध्ये नागपूर , अमरावती वगळता संपूर्ण विदर्भात त्याचबरोबर सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगड त्याचबरोबर पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

01 नोव्हेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 01 नोव्हेंबर रोजी राज्यातील नाशिक, पुणे ,सातारा , कोल्हापूर ,परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी,  रायगड या जिल्ह्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

02 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 2 नोव्हेंबर रोजी राज्यातील सातारा,  बीड,  कोल्हापूर,  पुणे , नाशिक , सिंधुदुर्ग , रत्नागिरी, रायगड, मुंबई ,धाराशिव, लातूर ,नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

03 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 03 नोव्हेंबर रोजी राज्यातील लातूर , धाराशिव, बीड ,अहमदनगर ,सोलापूर, कोल्हापूर, सांगली ,सातारा, पुणे , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

04 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 04 नोव्हेंबर रोजी राज्यातील नांदेड , लातूर , धाराशिव , बीड , नगर , सातारा , पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *