राज्यात आजपासुन दि.03 नोव्हेंबर पर्यंत या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या नविन अंदाज .

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update upto 03 November ] : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दिनांक 03 नोव्हेंबर पर्यंत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . बंगालच्या उपसागरांमध्ये तयार झालेल्या वादळाचा परिणाम राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे .

सदर वादळाचा परिणाम राज्यात दिनांक 03 नोव्हेंबर पर्यंत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . दरम्यानच्या काळात राज्यत थंडीची लाट राज्यात हळु – हळु पसरणार आहे . तर काही ठिकाणी धुकेही पडणार आहेत . या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

आज दि.01 नोव्हेंबर रोजीचा अंदाज : आज दिनांक 01 नोव्हेंबर रोजी राज्यात पुणे , कोल्हापुर , सातारा , परभणी , लातुर , छ.संभाजीनगर , रत्नागिरी , रायगड , नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

उद्या दि.02 नोव्हेंबर रोजीचा अंदाज : उद्या दि.03 नोव्हेंबर रोजी राज्यातील बीड , धाराशिव , लातुर , नगर , कोल्हापुर , सोलापुर , सातारा , सांगली , पुणे , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

03 नोव्हेंबर रोजीचा अंदाज : दिनांक 03 नोव्हेंबर रोजी राज्यातील बीड , धाराशिव , लातुर , कोल्हापुर , सांगली , सातारा , पुणे , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , नांदेड , नगर , नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

Leave a Comment