Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain Update News ] : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे . राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस जास्त करुन विदर्भ , मराठवाडा मध्ये सर्वाधिक पडत असतो , कारण या भागांमध्ये उन्हांची तिव्रता सर्वाधिक असल्याने , या ठिकाणी पाण्याचे बाष्प तयार होवून तेथेचे तापमान वाढीमुळे ढगांची टक्कर होवून वादळ , वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात होते .
सध्या राज्यातील एकंदरीत तापमान पाहिला असता , 40 अंश सेल्सिअस इतका तापमान आहे . हेच चित्र विदर्भ / मराठवाड्यात पाहीले असता , तेथे तापमान हे 45 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे , यामुळे उन्हाची तिव्रता अधिकच वाढत चालल्याने , अवकाळी पाऊस पडण्याची मोठी शक्यता आहे .
वाढत्या उन्हाच्या तिव्रतेमुळे उष्माघाताचे प्रमाण अधिकच वाढले आहेत , त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे राहीले ते पिकांचे देखिल नुकसान होण्याची शक्यता आहे .मागील आडवड्यांमध्ये विदर्भ / मराठवाडा तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे . मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या भागातुन समुद्र सपाटीपासून तब्बल 900 मीटर उंचीवरुन वारे वाहत आहेत , यामुळे विदर्भ , कनार्टक मध्ये वादळी वाऱ्यांची तिव्रता वाढली आहे .
राज्यातील गडचिरोली , गोंदिया , नागपुर , वर्धा , यवतमाळ , भंडारा , अमरावती या सात जिल्ह्यांमध्ये पुढील तिन दिवसांपर्यंत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे . यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , खानदेश या ठिकाणी या दिवसांमध्ये तुरळक अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे .उन्हाची तिव्रता राज्यात अधिकच वाढल्याने , अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे , तर मराठवाडा / विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तिव्र उन्हामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याने , तेथील लोकं अवकाळी पावसाची देखिल वाट पाहत आहेत .