शेतकऱ्यांना पेरणीची तयारी करण्याचा पंजाबरावांचा सल्ला ,आजपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; विभागनिहाय पावसाचा  अंदाज पाहा !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain Update News ] : राज्यांमध्ये आजपासुन मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामातज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे , यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागण्याचा सल्लाच देण्यात आला आहे . कोणत्या विभागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून  घेवूयात ..

कालपासुन राज्यांमध्ये उष्णता कमी झाली आहे तर दमटपणा सर्वाधिक जाणवत आहे , म्हणजेच पावसाची दमदार सुरुवात लवकरच होईल असे दर्शवत आहे . राज्यांमध्ये दिनांक 03 जुन ते 10 जुन दरम्यान सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल , ज्यांमुळे नदी , नाले भरुन वाहतील अशा प्रकारचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे .

पंजाबरांनी दिलेल्या अंदाजानुसार , दिनांक 03 जुन ते 10 जुन दरम्यानच्या कालावधीमध्ये नाशिक , पुणे , अहमदनगर , छत्रपती संभाजीनगर , जळगाव , बुलढाणा , परभणी , लातुर , बीड , धाराशिव , सांगली , सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल .यामुळे जमिनीतील ओलीचे प्रमाण चांगल्या प्रकारे होईल , यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी असा सल्ला दिला आहे .

यांमध्ये शेतीची मशागत , खत / बियाणांची खरेदी करणे इ.बाबीसाठी शेतकऱ्यांनी तयारीला लागावेत , असा सल्ला देण्यात आला आहे . राज्यांमध्ये कोकण , मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये 10 जुन पर्यंत मुसळधार पाऊस पडेल , तर या कालावधीमध्ये , विदर्भात किरकोळ ठिकाणी पाऊस हजेरी लावेल ..

तर मान्सुनच्या आगमनानंतर दिनांक 15 जुन पर्यात विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . म्हणजेच विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नयेत असे सुचित करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment