Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Rain update News ] : राज्यात तापमानाचा आकडा हा 44 अंश सेल्सिअस पर्यंत जावून पोहोचला आहे , यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे लाट पसरली आहे . यामुळेचे नागरिकांमध्ये अक्षरश : उन्हांपासून बचाव करीता अनेक उपाय योजना करीत आहेत .

तसेच खरीप खंगामाकरीता शेतीची मशागत देखिल सुरु असल्याने , उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सोसावे लागत आहेत , अशातच शेतकऱ्यांची चिंता अजुन वाढणार असल्याचे भारतीय हवामान खात्यांकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . पुढील नमुद 14 जिल्ह्यांमध्ये चक्रिवादळांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणत गारपिटी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

बंगालच्या उपसागरांमध्ये उद्भवलेल्या वादळाचा परिणाम हा राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये होणार आहे , या वादळाची तिव्रता अधिक असणार आहे , मिळालेल्या माहितीनुसार देशात तेलंगणा , कर्नाट व उत्तर तामिळ भागांमध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे . याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उन्हांचा उकाडा कायम आहे व वादळ ( चक्रिवादळ ) निर्माण होण्यास पोषक हवामान निर्माण झाले आहे . यामुळे वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

सदर वादळी वाऱ्यांचा गारपीटीची शक्यता ही पुढील 2 दिवसांपर्यंत शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमये विदर्भातील अमरावती , वर्धा , नागपुर या 3 तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटांसह वादळी वारे वाहण्याची मोठी शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे .

याशिवाय राज्यातील लातुर , नांदेड , हिंगाली , बुलडाणा , अकोला , वाशिम , चंद्रपुर , यवतमाळ , गडचिरोली , गोंदिया , भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखिल वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , तर काही भागांमध्ये चक्रिवादळ उद्भवणार आहेत .

यामुळे वरील नमुद 14 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *