Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next four days ] : महाराष्ट्र राज्यात पुढील 04 दिवस ( दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 ) पर्यंत पावसाचा अंदाज कसा असेल , याबाबत सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आज दिनांक 09 ऑक्टोंबर ते दिनांक 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत राज्यात तुरळक अशा ठिकाणी विजेच्या गडगडाटीसह किरकोळ स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . आज दि.09 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर अशा 02 दिवस संपुर्ण विदर्भामधील संपर्ण 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
दि.10 व 11 ऑक्टोंबर : दिनांक 10 व 11 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्यात नाशिक , खान्देशातील जिल्हे , तसेच सांगली , कोल्हापुर , सोलापुर , सातारा , पुणे , नगर या जिल्ह्यांमध्ये मध्यम अशा स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर सदर कालावधीत राज्यात मराठवाडा व संपुर्ण कोकण विभागांमध्ये विजेच्या गडगडाटीसह किरकोळ अशा स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
एकंदरित राज्यात दिनांक 09 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर दरम्यान राज्यात वरील नमुद करण्यात आलेल्या जिल्ह्यात किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे .
यानंतर दिनांक 15 ते 31 ऑक्टोंबर दरम्यान राज्यात ढगाळ वातावरणासह वीजेच्या गडगडाटीसह केवळ मध्यम अशा स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच राज्यात दिनांक 22 ते 26 ऑक्टोबर अशा 05 दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .