Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next four days ] : जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यांपासुन ते ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील सर्वत्र ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे . तर सद्य स्थितीमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण काहीसा कमी झाला आहे .

आजपासुन पुढील 4 दिवसांसाठी भारतीय हवामान खात्यांकडून नवा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांत आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी राज्यात सोमवार पर्यंत विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागांमध्ये पावसाची विश्रांती असणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडुन देण्यात आला आहे .

तर दिनांक 10 ऑगस्ट ( आजपासुन ) ते दिनांक 13 ऑगस्ट पर्यंत राज्यातील वर्धा , गडचिरोली , यवतमाळ , बुलढाणा , अमरावती , वाशिम , भंडारा , चंद्रपुर , गोंदिया , नागपुर , गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

यामुळे सदर 11 जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , मात्र राज्यातील उर्वरित भागांमध्ये पाऊस कमी – अधिक प्रमाणे पडणार असल्याचा अंदाज व्यक्ती करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

तर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार , राज्यात दिनांक 11 ऑगस्ट ते दिनांक 19 ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावस कमी – अधिक प्रमाणात पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *