Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next four days ] : राज्यांमध्ये शनिवार पासुन चांगला पाऊस होत आहे . काही ठिकाणी पावसाने चांगलीच धुमाकुळ घातली आहे . विदर्भातील काही भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाल्याने , चक्क घरांमध्ये पाणी शिरले आहेत . तर पुढील चार दिवसांमध्ये राज्यात नेमका कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल , याबाबत सविस्तर अंदाज पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..

देशांमध्ये दिनांक 20 जुलै रोजी ओडिशाच्या किनारी भागांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रांची तिव्रता कमी झाली असल्याने , कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे . तर दक्षिण गुजरात ते दक्षिणेकडे उत्तर केरळपर्यंतच्या किनारी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा अद्याप स्थिर आहे . यामुळे आज दिनांक 22  जुलै रोजी राज्यात कोकण व विदर्भातील बऱ्याच ठिकाण तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्र भागातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आली आहे .

दिनांक 22 जुलै रोजीचा पावसाचा अंदाज : दिनांक 22 जुलै रोजी राज्यात कोकण , विदर्भ , मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . यापैकी सातारा जिल्ह्याचा घाट , रायगड , रत्नागिरी , भंडारा या जिल्ह्यांमध्ये 204 मीमी पर्यंत पावसाचा मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे ,सदर जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

दिनांक 23 जुलै रोजीचा पावसाचा अंदाज : दिनांक 23 जुलै रोजी रायगड , रत्नागिरी , पुणे , सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे , यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .

दिनांक 24 जुलै रोजीचा पावसाचा अंदाज : दिनांक 24 जुलै रोजी रात्याील पुणे व सातारा या जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने , सदर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .

दिनांक 25 जुलै रोजीचा पावसाचा अंदाज : दिनांक 25 जुलै रोजी राज्यांमध्ये विदर्भ , कोकण व मराठवाडा विभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *