Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next 24 hours ] : राज्यात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे . सदर सुधारित नविन अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पुढील 24 तासांमध्ये ( दि.03 नोव्हेंबर रोजी ) राज्यातील बीड , लातुर , धाराशिव , सोलापुर , नगर , सांगली , कोल्हापुर , सातारा , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , नांदेड , पुणे 12 जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे .
उद्याचा अंदाज : उद्या दि.04 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील नांदेड , लातुर , पुणे , सातारा , नगर , बीड , धाराशिव या सात जिल्ह्यांमध्ये किरकोळ स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे .
सदरचा पाऊस हा मध्यम स्वरुपाचा असणार असल्याने , शेतकऱ्यांनी चिंता करायची आवश्यक नाही . परंतु या काळांमध्ये पिकांची काढणी करताना शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावेत ..
उद्यानंतर राज्यात पावसाचे प्रमाणे बरेचसे कमी होणार आहे , परंतु पश्चिम महाराष्ट्र , कोकण या विभागांमध्ये किरकोळ स्वरुपाचा पाऊस पुढील काही दिवस राहणार आहे . तर मराठवाडा , विदर्भातुन पाऊस विराम घेणार आहे .