राज्यात पुढील 24 तासांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update for next 24 hours ] : सध्या राज्यामध्ये मान्सून परतीच्या काळानंतर देखील पावसाचा मोठा धुमाकूळ सुरू आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे .

पुढील 24 तासांमध्ये राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , सांगली , सातारा या जिल्ह्यामध्ये वादळासह पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .

सध्या ऑक्टोबर हिटमुळे तापमानात दिवसा मोठी वाढ होत आहे , त्याचा परिणाम सायंकाळच्या वेळी वातावरणामध्ये , ढग तयार होऊन पाऊस पडत आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदरचा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असल्याने , शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .

तर दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत पावसाचे दुसरे आवर्तन राहणार आहे . या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर दिनांक 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान राज्यात सातारा , सांगली , कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

राज्यामध्ये दि.15 ऑक्टोबर पासून नैऋत्य मान्सून सुरू झाल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे . पावसाच्या दुसऱ्या आवर्तनामध्ये , दक्षिण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , सदर आवर्तन 26 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे .

Leave a Comment