Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next 14 days ] : राज्यांमध्ये पुढील 14 दिवस पाऊस कसा राहील , या बाबत मान्सुनचा अंदाज हवामान खाते व हवामान तज्ञांकडून वर्तविण्यात आलेला आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 4 दिवस हे राज्यात काही ठिकाणी हलके ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर परतीचा पाऊस हा नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मुक्काम असून , मंगळवारी मान्युन हा महाराष्ट्र राज्यासह छत्तीसगड , ओडीसा , तेलंगणा , कर्नाटक तसेच संपुर्ण देशांतुन निघुन गेला , परंतु त्या नंतर देखिल राज्यांमध्ये परतीचा पाऊस पुन्हा माघार घेत आहे .
राज्यातुन मान्सुन हा दिनांक 15 ऑक्टोंबर पासुन निघून गेला , परंतु मान्सुनचा पाऊस पुन्हा – पुन्हा परत येत आहे . देशांमध्ये दि.15 ऑक्टोंबर पासुन ईशान्य मान्सुनचे रुपांतरण झाले आहेत . राज्यात आज दिनांक 17 ऑक्टोंबर पर्यंत कोकण वगळता पुर्ण राज्यात ढगाळ वातारणाचा अंदाज आहे . तर फक्त काही तुरळक ठिकाणीच पाऊसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .
तर कोकणातील सातही जिल्ह्यांमध्ये आज रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे . यानंतर राज्यात दि.22 ते 26 ऑक्टोंबर दरम्यानच्या काळात पावसाचे दुसरे आवर्तन अंदाजित होते , परंतु 4 दिवस अगोदरच म्हणजेच दि.18 ते 22 ऑक्टोंबर दरम्यान राज्यात तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये हलका पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .
यांमध्ये मुंबई शहर , धाराशिव , लातुर , नांदेड , बीड , सोलापुर , कोल्हापुर , सांगली , सातारा , पुणे , नगर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड , मुंबई उपनगर , हिंगाले , परभणी , वर्धा , भंडारा , नागपुर , गडचिरोली , गोंदिया , चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .
सदरचा पाऊसमान हा ऑक्टोंबर हिटमुळे राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे .