Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update dated 27 to 30 November ] : राज्यात दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील 09 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . या संदर्भात भारतीय हवामान विभाग तसेच हवामान तज्ञ माणिकराव खुळे व पंजाबराव डख यांनी नविन अंदाज व्यक्त केलेला आहे .

सदर अंदाजानुसार , राज्यात पुढील आठवड्यात हवामान हे कोरडे राहणार आहेत , यावेळी थंडी सुरु राहील परंतु या दरम्यान राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . सदरचा कालावधी हा दिनांक 27 नोव्हंबर ते 30 नोव्हेंबर 2024 असा असणार आहे .

या 09 जिल्ह्यात पावसाचा अंदाज : राज्यात दिनांक 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यानच्या काळात राज्यातील धाराशिव , लातुर , कोल्हापुर , सांगली , सातारा , पुणे , अहमदनगर , नांदेड , सोलापुर या नऊ जिल्ह्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

तर राज्यात सदर काळात थंडी काहीशी कमी होणार असल्याचा अंदाज आहे , तसेच दिनांक 01 ते 4 डिसेंबर दरम्यानच्या काळांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यंदा देखिल अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे .सदर काळांमध्ये शेतकऱ्यांनी शेती‍ पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *