Live Marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update dated 25 , 26 & 27 September ] : राज्यांमध्ये दिनांक 23 सप्टेंबर पासुन मान्सुन परतीच्या प्रवासाला जात आहे , सदर परतीच्या मान्सुनमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस पडत आहेत . दिनांक 25 , 26 व 27 सप्टेंबर रोजीचा सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दि.25 सप्टेंबर 2024 रोजीचा अंदाज : दिनांक 25 सप्टेंबर म्हणजेच आज रोजी राज्यातील पुणे , रायगड या जिल्ह्यांना अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , तर सदर दोन्ही जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची संभावना हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय आज रोजी नगर , नाशिक , सिंधुदुर्ग , ठाणे , रत्नागिरी , पालघर , मुंबई या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे सदर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
26 सप्टेंबर 2024 रोजीचा अंदाज : दिनांक 26 सप्टेंबर म्हणजेच उद्याच्या दिवशी राज्यतील पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यतामुळे पालघरला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .याशिवाय राज्यातील छ.संभाजीनगर , जालना तसेच विदर्भातील सर्व जिल्हे , उत्तर महाराष्ट्रातील सर्वच 05 जिल्हे , सातारा , पुणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
27 सप्टेंबर 2024 रोजीचा अंदाज : दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील पुणे , रायगड , नाशिक , धुळे ,नंदुरबार ,तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्हे यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
दिनांक 27 सप्टेंबर नंतर राज्यात पावसाची तिव्रता कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून देण्यात आला आहे . तर राज्यात मान्सुन परतीचा पाऊस दिनांक 02 ऑक्टोंबर पर्यंत पडणार असल्याची संभावना हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आली आहे .