Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra new year Public leave paripatrak ] : सन 2025 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी सामान्य प्रशासन विभाग मार्फत जाहीर करण्यात आलेले असून , त्या संदर्भात अधिकृत शासन परिपत्रक दि.04 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

नविन सन 2025 या वर्षांमध्ये एकुण 24 सार्वजनिक सुट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत . तर केवळ बँकेकरीता दिनांक 01 एप्रिल रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . सदरच्या सुट्या ह्या महाराष्ट्र शासनांकडे सोपिण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत .

जानेवारी / फेब्रुवारी / मार्च 2025 मधील सुट्ट्या : प्रजासत्ताक दिन निमित्त दिनांक 26 जानेवारी , छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19 फेब्रुवारी तर महाशिवरात्री निमित्त 26 फेब्रुवारी , तर होळी सणा निमित्त 14 मार्च रोजी तर गुढीपाडवा निमित्त 30 मार्च तर रमझान ईद निमित्त 31 मार्च रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

एप्रिल / मे / जुन 2025 मधील सुट्ट्या : रामनवमी सणानिमित्त दि.06 एप्रिल रोजी , महावीर जन्म कल्याणक निमित्त दि.10 एप्रिल , तर गुड फ्रायडे निमित्त दि.18 एप्रिल रोजी , तर महाराष्ट्र दिन निमित्त दि.01 मे , बुद्ध पौर्णिमा निमित्त 12 मे रोजी , तर बकरी ईद निमित्त 07 जुन रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

जुलै / ऑगस्ट / सप्टेंबर 2025 मधील सुट्ट्या : मोहरम निमित्त 06 जुलै रोजी , स्वातंत्र दिन निमित्त 15 ऑगस्ट तर पारशी नववर्ष दिन निमित्त 15 ऑगस्ट रोजीच तर गणेश चतुर्थी निमित्त 27 ऑगस्ट रोजी तर ईद – ए मिलाद सणा निमित्त 05 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

ऑक्टोंबर / नोव्हेंबर / डिसेंबर 2025 मधील सुट्ट्या : महात्मा गांधी जयंती निमित्त दि.02 ऑक्टोंबर रोजी , दसरा सणा निमित्त दि.02 ऑक्टोंबर रोजीच तर दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपुजा ) निमित्त दि.21 ऑक्टोंबर रोजी , दिवळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त दि.22 ऑक्टोंबर रोजी तर  गुरुनान जयंती निमित्त दि.05 नोव्हेंबर रोजी तर ख्रिसमस निमित्त दि.25 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सुट्टी शासन परिपत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *