Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्राच्या राजकारांमध्ये मोठा भुकंप झालेला आहे . अजित पवार यांनी आत्ताची राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 35-40 आमदार घेवून अजित पवार सह इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे .

सध्या महाराष्ट्राच्या राजकारांमध्ये काय सुरु आहे हेच राज्यातील नागरीकांना समजत नाही . राज्याचे नागरिक कोणत्या पक्षाला मतदान करत आहेत , तर राजकारांमध्ये आगामी घडामोडी नेमकी वेगळीच होत आहेत . यामुळे आता नागरिकांना असा प्रश्‍न पडत आहे कि , महाराष्ट्राच्या राजकारांमध्ये नेमके चाललंय तरी काय ?

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ , हसन मुश्रीफ , दिलीप वळसे पाटी , धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे . अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये राजकीय कलह निर्माण झाल्याने , अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपा- शिंदे गटामध्ये सामिल झाले आहेत .

हे पण वाचा : अजित पवार भाजपा सोबत जाण्याचा मास्टर माईंड / प्रमुख कारण जाणुन घ्या !

एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत , तर राज्याचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत यापैकी एक देवेंद्र फडणवीस तर दुसरे अजितदादा पवार .राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्याने राज्याच्या राजकारणांमध्ये मोठा भुकंपच झालेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *