Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update news ] : हवामान खात्याकडून परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र राज्याला धोक्याची घंटा देण्यात आली आहे . सदर परतीच्या पावसामुळे राज्यात मोठे नुकसान होण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे .
कालपासून मान्सून परतीचा मार्गावर असून , राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे . यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . कालपासून राज्यातील मराठवाडा विभागामध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडत आहे . यामुळे सोयाबीन पीक काढणीवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे . तर हा पाऊस दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत असाच जोरदार पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे .
हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार मुंबई , शहर मुंबई उपनगर भागामध्ये आज पासून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे . त्याचबरोबर राज्यातील ठाणे ,जळगाव ,रत्नागिरी, रायगड ,धुळे ,नंदुरबार , नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पासून अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे .
सदर मान्सून परतीच्या पावसामुळे सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . कारण पुढील चार दिवस मराठवाडा विभागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने , पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
तसेच विदर्भामध्ये आज पासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने , नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .