Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election 2024 ] : लोकसभा निवडणुका 2024 करीता महायुती सरकार मध्ये उमेदवारासाठी चुरसी सुरु आहे , यांमध्ये प्रामुख्याने अजित पवार , जागावाटपाच्या फॉम्युल्यावरुन नाराज दिसून येत आहेत , तर एकनाथ शिंदे गटांचे पारडे अधिक जड असून देखिल जागावाटपांमध्ये कमी जागा मिळत असल्याने , एकनाथ शिंदेची नाराजगी कायम आहे .
लोकसभा निवडणुका 2024 करीता राज्यातील 48 जागेसाठी पक्षांमध्ये जागावाटप करणेकरीता शुक्रवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दीड तासांची बैठक संपन्न झाली , या बैठकीमध्ये दीड तास जागावाटपावरुन चर्चा झाली . यांमध्ये जागावाटपावरुन भाजपा वर एकनाथ शिंदे व अजित पवार नाराज असल्याचे दिसून येत आहेत .
अजित पवार यांचे 9 आणि 90 जागेचा फॉम्युला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांस लोकसभेमध्ये 9 तर विधानसभेत 90 जागा मिळावेत , असे गणित गृहीत धरण्यात आलेले होते , परंतु गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या दीड तासांच्या बैठकीनंतर परताना नाराज दिसून येत होते .सध्या अजित पवार गटाकडे कमी खासदारांची संख्या असल्याने , अजित पवार गटांस लोकसभेत कमी जागा मिळणार हे निश्चित झालेले आहेत .
या तुलनेत एकनाथ शिंदे ( शिवसेना ) यांच्याकडे लोकसभेत एकुण 13 खासदार आहेत , म्हणजेच एकनाथ शिंदे गटांस अजित पवार गटांस अधिक जागा मिळतील हे निश्चित आहे . शिवाय एकनाथ शिंदे यांच्या भाजपा सोबत दाखवलेली विश्वासहर्ता लक्षात ठेवून गृहमंत्री अमित शहा कडून अधिक जागा मिळतील हे निश्चित आहे . कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत युती करण्याचे धोरण आखले त्यावेळी गृहमंत्री अमित शहानेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केले होते .
यामुळे एकनाथ शिंदे गटांना निदान 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे तर , अजित पवार गटांस 3 ते 4 जागावरच समाधान मानावे लागणार आहेत . कारण विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा सदस्यांची संख्या अधिक आहे , त्यांना देखिल प्रथम स्थान देणे भाजपाचे कर्तव्ये आहे . अजित पवारचा 9 जागा लोकसभा व 90 जागा विधान सभेत न मिळाल्यास कार्यकत्यांमध्ये नाराजगी कायम असणार आहे . सदर बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे , अजित पवार , देवंद्र फडणीस तसेच बावनकुळे उपस्थित होते .